नातू उद्योग समूह लोगो मराठीEnglish
नातू उद्योग समूह (एओपी) · पुणे · २०२३ पासून · मुळे १९९६ पासून

संस्कारांचे मूळ,
उद्योगांच्या शाखा

Rooted in sanskar. Branching into enterprise.

नातू उद्योग समूह ही मिलिंद नातू आणि सहकारी यांनी चालविलेल्या विविध व्यवसाय उद्योगांची “एकछत्री” ओळख आहे. सदर उद्योग समूह हा २०२३ मध्ये ‘असोसिएशन ऑफ पर्सन्स’ (एओपी) म्हणून संकल्पित झाला. त्यावेळी ‘नातू प्रॉपर्टीज – रिअल इस्टेट सल्लागार सेवा, फ्रँचायझी नेटवर्क’ आणि ‘नातू ॲग्रो उद्योग – नैसर्गिक खतांचे उत्पादन व व्यापार’ हे तीन व्यवसाय सुरू होते. ह्या तीनही व्यवसायांना सदर छत्राखाली आणण्यात आले. हे सर्व एका नावाखाली आणल्याने आपण कोण आहोत आणि कशासाठी उभे आहोत, हे सांगणे सोपे झाले. प्रत्येक उद्योगाची नोंदणी आणि टीम स्वतंत्र आहे. याची मुळे १९९६ मध्ये आहेत, जेव्हा मिलिंद नातू यांनी एका खोलीतून ‘अक्षर सेवा’ हा छपाई व्यवसाय सुरू केला.

The founder's journey

संस्थापकांचा प्रवास · १९९६ ते आज

तीस वर्षे; घरात व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना — आणि बदल येण्याआधीच तो ओळखण्याची सवय.

१९९६
The dream that changed course

बदललेलं स्वप्न

बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, गरवारे कॉलेज, पुणे. भारतीय सैन्यात जाण्याचे ध्येय होते; दृष्टीच्या मर्यादेमुळे ते दार बंद झाले.

नोव्हें. १९९६
Akshar Seva begins

अक्षर सेवाची सुरुवात

एका महिन्याच्या स्क्रीन-प्रिंटिंग कोर्सपासून एक प्रोप्रायटरी व्यवसाय उभा राहिला — कुटुंबातील पहिला उद्योग.

१९९७–२००४
Growing word by word

अक्षरागणिक वाढ

डीटीपी, प्रकल्प अहवाल, कॉर्पोरेट छपाई आणि महाविद्यालयांची माहितीपत्रके. सुदर्शन केमिकल, कॅमलिन, टाटा बॅटरीज, अवाया, कॉग्निझंट आणि सिमँटेक यांचे पुरवठादार.

२००५
A press of our own

स्वतःचा छापखाना

विशेष स्क्रीन-प्रिंटिंग छापखाना, पुण्यात स्पॉट यूव्ही वार्निशिंगची सुरुवात, आणि दहा जणांची टीम.

२०११
Reading the change early

बदलाची चाहूल

स्क्रीन प्रिंटिंगची घसरण सुरू होण्याआधीच छापखाना विकला, आणि रिअल इस्टेटचे काम सुरू झाले.

२०१३
Balaji Real Estates

बालाजी रियल इस्टेट्स

एक प्रोप्रायटरी फर्म — आणि चांगल्या ब्रोकरने काय कधीही करू नये, याची शाळा.

२०१५–१६
Natu Properties is born

नातू प्रॉपर्टीजचा जन्म

ब्रँड सल्लागार सविता पटवर्धन यांच्या सल्ल्याने फर्मला कुटुंबाचे नाव मिळाले. ईमेल, शिस्तबद्ध पद्धती आणि वेळेवर साइट-भेटी यांमुळे कोथरूडमध्ये वेगळी ओळख निर्माण झाली.

२०१७–१९
No salaries, shared success

पगार नाही, यशात वाटा

सुनील खत्रावत, नंतर आशुतोष भगत आणि महेश माळी कमिशन-वाटणीच्या पद्धतीने जोडले गेले. २०१८ मध्ये महारेरा एजंट नोंदणी.

२०२०–२१
Lockdown, and Natu Properties 2.0

लॉकडाऊन आणि नातू प्रॉपर्टीज २.०

कोविड-१९ च्या काळात तीन जणांची टीम एकत्र टिकून राहिली, आणि फ्रँचायझी नेटवर्कने आकार घेतला.

नोव्हें. २०२२
Back to microbiology

मूळ विषयाकडे परत

मिलिंद आणि अलका नातू यांनी नातू ॲग्रो उद्योग एलएलपी स्थापन केली: शेणाच्या गोवऱ्या, शेण पावडर, खत, गांडूळखत आणि व्हर्मिवॉश.

२०२२–२३
One umbrella

नातू उद्योग समूह

नातू उद्योग समूहाची (एओपी) संकल्पना आकाराला आली, आणि सुरू असलेले तीनही उद्योग त्या नावाखाली आले.

२०२३
First batch, and a firm in its own right

पहिली तुकडी, फर्म म्हणून ओळख

महारेरा एजंट परीक्षेच्या पहिल्या तुकडीतील मोजक्या एजंटांपैकी एक; नातू प्रॉपर्टीजची फर्म म्हणून नोंदणी (A52100041919).

२०२४–२५
My Bharat Biz — tried and closed

माय भारत बिझ — प्रयोग आणि निरोप

स्थानिक हिंदू उद्योजकांची मोफत निर्देशिका, वर्षभरानंतर बंद केली. कुठे थांबायचे हे जाणणे, हाही एक धडा.

२०२६
Today

आज

चार सक्रिय फ्रँचायझी, सर्व उद्योग एआय-सज्ज होण्याच्या मार्गावर — आणि श्रीरामरामेश्वर देवस्थान संकल्पित.

स्वाइप करा · किंवा बाण वापरा · १ / १४
Our structure, drawn as a temple

नातू उद्योग समूहाची रचना · देवालय रूपात

एक अधिष्ठान, तीन स्तंभ, एक उद्देश

नातू उद्योग समूह स्वतः काहीही विकत नाही. प्रत्येक नातू उद्योग जी मूल्ये, जे नाव आणि जो विश्वास घेऊन चालतो, ते जपणारी ही ‘असोसिएशन ऑफ पर्सन्स’ आहे. प्रत्येक उद्योग स्वतंत्रपणे उभा आहे — स्वतःची नोंदणी, टीम आणि वेबसाइट — आणि सर्व एकाच अधिष्ठानावर उभे आहेत.

देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलूख बडवावा कां बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥
— समर्थ रामदास स्वामी
आमचा भावार्थ: देवाला सर्वोच्च स्थानी ठेवून, सर्वांना कामाला लावावे; कोणतेही शहर, राज्य वा देश असो — तेथील भूमी ढवळून काढून नव्या व्यवसाय-संधी शोधाव्यात; आणि त्या प्रत्येक प्रयत्नामागे धर्म व सेवा हाच हेतू असावा.
श्रीरामरामेश्वर देवस्थान लोगो — सामाजिक दायित्व पाहाNatu Properties
नातू प्रॉपर्टीज
Natu Properties 2.0
नातू प्रॉपर्टीज २.०
Natu Agro Udyog
नातू ॲग्रो उद्योग
Natu Udyog Samuha logo
नातू उद्योग समूह
(एओपी)
सर्व उद्योगांना आधार देणारे अधिष्ठान
शिखर
श्रीरामरामेश्वर देवस्थान
संकल्पित · स्तंभ ज्याला तोलून धरतात तो उद्देश
स्तंभ
तीन उद्योग
प्रत्येक उद्योग, एक स्तंभ
अधिष्ठान
श्रीरामरामेश्वर देवस्थान — संकल्पित उपक्रम